चाकण लायन्स क्लबकडून शिक्षक दिनानिमित्त विश्वशांतीनिकेतन विद्यालयातील गुरुजनांचा सन्मान
चाकण वार्ताहर:
दि. 5 सप्टेंबर
लायन्स क्लब, चाकण यांच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने चाकण येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. श्री. हनुमंत कड, ला. सौ. ज्योती कड, ला. सचिव श्री. मंगेश प-हाड, ला. खजिनदार श्री. ऋत्विक मुटके, ला. लक्ष्मण नाणेकर गुरुजी, ला. डॉ. रमेश जाधव, प्रकाश मुटके, रत्नमाला भुजबळ, ज्योती कड श्री. मुंगसे सर, सोरटे सर आदी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
याचे औचित्य साधून विश्वशांतिनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची वेशभूषा परिधान केली होती. विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या विषयी माहितीपर भाषण केली. आज विद्यार्थ्यांनी विद्यालयातील विविध वर्गावर अध्यापन केले.
लायन्स क्लबच्या वतीने चाकण येथील श्री. एस. पी. आघाव पाटील शिक्षण संस्था संचलित, विश्वशांतिनिकेतन विद्यालय आणि संतोष ऑल राऊंडर अकॅडमीचे डायरेक्टर प्रा. डॉ. प्रवीण आघाव प्राचार्या प्रा. अर्चना प्रविण आघाव, उपप्राचार्या सौ. संध्या जाधव, पर्यवेक्षिका आणि सौ. दर्शना कापुरे, सहशिक्षिका अश्विनी गोरे, रूपाली सोनुले, रूपाली हुलुळे, रेश्मा जाधव, पल्लवी पवार, हर्षदा दरवडे, मिसबा काझी, सादिया पठाण, गोकुळ धामणे आदींना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
