रावणगाव : रावणगाव (ता. दौंड) येथील
वैशाली जितेंद्र नेमाडे यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या दौंड तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजप दौंड तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. आमदार राहुल कुल, जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कांचन कुल यांच्या राहू येथील निवासस्थानी निवडीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी भीमा पाटसचे माजी संचालक लक्ष्मण रांधवण, अरुण आटोळे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव आटोळे, ग्रामपंचायत सदस्य हौशीराम आटोळे, संजय जाधव आदी उपस्थित होते.

