खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३६ शाळांमध्ये रुम टू रिड कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन आज दिनांक 5 सप्टेंबर 2022 शिक्षक दिनी जि.प प्राथमिक शाळा राजगुरुनगर क्र.१ येथे मा. जीवन कोकणे (गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती खेड ) यांच्या हस्ते मोबाईल वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास मा जीवन कोकणे (गटशिक्षण अधिकारी ) मा . दत्तात्रय गोसावी ( केंद्रप्रमुख ) श्री भाऊसाहेब वायदंडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मा.श्री.मनोहर गोरगल्ले माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती अध्यक्ष खेड तालुका, मा.श्री.आप्पा भंडलकर जेष्ठ मार्गदर्शक जय मल्हार क्रांती संघटना, जयश्री जाधव, सुमन लोणारी, गहिणीनाथ पिंगळे, मुख्याध्यापक कांचन वायाळ, शिक्षक दगडू पिंगळे, रविंद्र मावळे, अनिल साकोरे, स्मिता पवळे, जयसिंग उकिर्डे, गीता सांगडे , मुख्याध्यापक सत्यवान शितोळे, उत्तम पाषाणकर,व विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. तसेच रूम टू रीड कार्यक्रम अधिकारी मा. कनुप्रिया रणसुभे, कार्यक्रम सहाय्यक पूजा भिलारे आणि इतर सहकारी देखील उपस्थित होते. सर्वांनी मोबाईल वाचनालयाच्या पुढील नियोजित कार्यक्रमास मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दत्तात्रय गोसावी यांनी सुत्रसंचालन श्री दगडू पिंगळे यांनी तर आभार मुख्याध्यापक सौ कांचन वायाळ यांनी मानले. 👆👆👆👆👆👆👆—————–पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क————–. 👆👆👆👆👆👆👆
